एक्स्प्लोर

Pune Crime : शिंदेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाने पुतण्या-पुतणीवर बंदुक रोखली, आमदार विजय शिवतारेंच्या भाचीकडून गुन्हा दाखल

Pune Crime : एका लग्नाच्या कार्यक्रमात दोन कुटुंबातील वाद हा हाणामारीपर्यंत गेला. यावेळी शिंदेंच्या पुणे जिल्हाध्यक्षाने त्यांच्याच पुतण्या-पुतणीला जीवे मारण्याची धमकी दिली. 

पुणे : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांनी लग्न सोहळ्यात आपल्याच पुतण्या आणि पुतणीवर पिस्टल रोखून धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलिस स्टेशनमध्ये आमदार विजय शिवतारे यांची भाची केतकी धनंजय झेंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. दिलीप यादव हे आमदार विजय शिवतारे यांचे चुलत मेव्हणे आहेत. तर फिर्यादी केतकी धनंजय झेंडे या शिवतारे यांच्या सख्ख्या भाची आहेत. कुटुंबातील जुना वाद असा चव्हाट्यावर आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

सासवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीनुसार, शनिवारी सासवड-हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये फिर्यादी झेंडे यांचे चुलत भावाचा साखरपुडा होता. त्या कार्यक्रमाला केतकी झेंडे या सहकुटुंब हजर होते. याच कार्यक्रमात विनय यादव, दिलिप यादव, सुनिता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव उपस्थित होते. 

फिर्यादी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ चिनू उर्फ संकेत यादव हा झेंडे यांच्या परिवारातील सदस्यांना खिजविण्याच्या हेतूने जवळ आला. 'तुम्ही शनिवारी माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आला नाहीत. मग आज या साखरपुड्यात कार्यक्रमाला कसे काय आले?' असा प्रश्न त्याने केला.

यावरून झेंडे यांचे दोन्ही भाऊ आणि चुलत भाऊ यांची चिनू यादव याच्याशी किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळी चुलत भाऊ चिनू हा या कुटुंबातील सदस्यांपासून निघून गेला. पुढे चिनू हा दिलीप यादव यांच्या कुंटुबीयांच्या घोळक्यात गेला. त्यानंतर काही मिनिटात दिलीप यादव, विनय यादव, सुनिता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव आणि इतर काहीजण झेंडे यांच्या भावांच्या अंगावर धावून आले. 

यातील अक्षता यादव, सुनिता यादव, शुभांगी दौंडकर यांनी दोन्ही भावांच्या अंगावर जाऊन त्यांना मारहाण केली. यामध्ये दोन्ही भावांना वळ येईपर्यंत मारहाण करण्यात आली. तसेच या प्रसंगी केतकी धनंजय झेंडे मधे पडल्या असता दिलीप यादव आणि विनय यादव यांनी त्यांना जोरात ढकलून दिले. या ढकला ढकलीत झेंडे यांच्या गळ्यातील टेम्पल हार, अंदाजे 3.30 ग्रॅम वजनाचा हार गहाळ झाला. 

याच दरम्यान दिलीप आणि विनय यादव यांनी कंबरेचं पिस्टल काढून झेंडे आणि त्यांच्या भावांच्या अंगावर ताणून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा सासवड मध्ये दिसलात तर बघा अशी धमकी दिलेली. तसेच या आधी देखील यादववाडी येथे झेंडे यांचे भाऊ प्रसाद यादव व सागर यादव गेले असता विनय व दिलिप यादव यांनी त्यांचेकडील पिस्टल ऊगारुन जिवे मारणेची धमकी दिलेली होती. 

त्या अनुषंगाने त्यावेळी सासवड पोलिस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा देखल करण्यात आला होता. शनिवारी सासवड हडपसर रोडवरील महाराजा लॉन्स मध्ये दिलीप सोपान यादव आणि केतकी धनंजय झंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या वादाची फिर्याद केतकी झेंडे यांनी दाखल केली. दिलीप यादव यांनीही तीन जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

ही बातमी वाचा: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Crime News: अनैतिक संबंधासाठी विवाहितेवर दबाव; संतापलेल्या पती-पत्नीने डोळ्यात मिरची पूड टाकली अन् धारदार शस्त्रानं युवकाला संपवलं; यवतमाळ घटनेनं हादरलं
अनैतिक संबंधासाठी विवाहितेवर दबाव; संतापलेल्या पती-पत्नीने डोळ्यात मिरची पूड टाकली अन् धारदार शस्त्रानं युवकाला संपवलं; यवतमाळ घटनेनं हादरलं
Crime News: गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून संतापला; बॉयफ्रेंडने आपल्या मित्राला संपवलं अन् अपघाताचा बनाव रचून रेल्वे रुळांवर बांधलं..., हादरवणारी घटना
गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून संतापला; बॉयफ्रेंडने आपल्या मित्राला संपवलं अन् अपघाताचा बनाव रचून रेल्वे रुळांवर बांधलं..., हादरवणारी घटना
LPG Gas Crisis: गॅस सिलिंडरचा काळाबाजार; नाशिकमध्ये मोठी कारवाई, तब्बल 25 लाखांचा साठा जप्त, नेमकं काय घडलं?
गॅस सिलिंडरचा काळाबाजार; नाशिकमध्ये मोठी कारवाई, तब्बल 25 लाखांचा साठा जप्त, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार, नाचताना धक्का लागल्याने सटकली, तडीपार गुंडावर मित्रांचाच हल्ला; नाशिकमधील खळबळजनक घटना
हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार, नाचताना धक्का लागल्याने सटकली, तडीपार गुंडावर मित्रांचाच हल्ला; नाशिकमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget