एक्स्प्लोर

37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची घोडदौड कायम! दिवसभरात 12 पदकांची कमाई

37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये वर्चस्व कायम राखताना शुक्रवारीही पदकांची लयलूट केली.

पणजी, गोवा :  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये वर्चस्व कायम राखताना शुक्रवारीही पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राने पाच सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्य अशी एकूण 12 पदकांची कमाई केली. यात संयुक्ता काळेच्या दुहेरी सुवर्ण पदकांचा समावेश आहे. 

महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील बॉल रँकिंग प्रकारात संयुक्ता काळेने सुवर्णपदक जिंकताना 25.95 गुण नोंदवले. तिची सहकारी किमया कार्लेने कांस्यपदक जिंकले. तिला 25.15  गुण मिळाले. हरयाणाच्या लाइफ अडलाखाला रौप्य पदक मिळाले. याचप्रमाणे संयुक्ताने हूप प्रकारातही 26.25 गुणांसह सोनेरी यश मिळवले. महाराष्ट्राचीच निशिका काळे (23.45 गुण) रौप्य पदकाची मानकरी ठरली. तर हरयाणाच्या लाइफ अडलाखाला कांस्य पदक मिळाले 
ट्रॅम्पोलीनमध्ये पहिली दोन्ही पदके जिंकून महाराष्ट्राने शानदार कामगिरी केली. राही पाखळेने सुवर्णपदक जिंकताना 43.88 गुणांची नोंद केली तर सेजल जाधवने 41.20 गुणांसह रौप्यपदक पटकावले. केरळच्या अन्विता सचिनला (40.17 गुण) कांस्य पदक मिळाले.

एरोबिक्समधील मिश्र दुहेरीत अद्वैत वझे व राधा सोनी यांनी सुवर्णपदक मिळवले त्यांनी 16.35 गुणांची नोंद केली. रौप्य पदक पश्चिम बंगालच्या अब्दुल चौधरी आणि सहिना यांनी तर कांस्य पदक गुजरातच्या निशांत चव्हाण आणि प्राकृती शिंदे यांनी पटकावले. सांघिक विभागातही महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. त्यांनी 16.60 गुणांची कमाई केली. 

एरोबिक्समधील ट्रायो प्रकारात आर्य शहा, स्मित शहा व उदय मढेकर यांनी रौप्य पदक जिंकले. त्यांना 17.10 गुण मिळाले. मणिपूरच्या संघाने सुवर्ण आणि सेनादलाने कांस्य पदक मिळवले.

आर्यने पुरुषांच्या वैयक्तिक विभागातही रुपेरी यश संपादन केले. त्याने 18.45  गुणांची नोंद केली. महिलांच्या वैयक्तिक विभागात साक्षी डोंगरेला (16.95 गुण) कांस्य पदक मिळाले. अरीहा पांगमबाम (मणिपूर) आणि माजिदा खातून (पश्चिम बंगाल) यांना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके मिळाली.

महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील अनइव्हन बार प्रकारात महाराष्ट्राच्या श्रद्धा तळेकरने 9.500 गुण  मिळवत कांस्य पदक मिळवले. ओडीशाच्या प्रणती नायकला सुवर्णपदक मिळाले, तर बंगालच्या प्रणती दासला कांस्य पदक मिळाले. याचप्रमाणे टेबल व्हॉल्ट प्रकारात इशिता रेवाळेने11.650 गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. बंगालच्या स्वस्तिका गांगुलीलाही संयुक्तपणे कांस्य पदक मिळाले. ओडीशाच्या प्रणतीला सुवर्ण आणि त्रिपुराच्या प्रोतिष्ठा समंथाला कांस्य पदक मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget