जोरावर सिंह आणि शबनम सिंह यांनी आकांक्षावर बाळाला जन्म देण्यासाठी दबाव टाकला. युवराजचाही त्यामध्ये समावेश होता. युवराज आई म्हणेन तसंच करत होता, असं स्वाती सिंह यांनी सांगितलं.
2/6
या प्रकरणाशी युवराजचा संबंध कसा, असाही प्रश्न स्वाती सिंहला विचारण्यात आला. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आर्थिक त्रास देणं याचाही समावेश होते. आकांक्षाला जेव्हा त्रास देण्यात आला तेव्हा युवराज केवळ बघ्याच्या भूमिकेत होता, असं स्वाती सिंहने सांगितलं.
3/6
कौटुंबिक छळ हा गंभीर गुन्हा समजला जातो, त्यामुळे या प्रकरणात काय होतं, ते पाहणं महत्त्वाचं असेल.
4/6
आकांक्षाने युवराज, त्याचा भाऊ आणि आईविरोधात कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली आहे, असं स्वाती सिंहने ‘स्पॉटबॉय डॉट कॉम’शी बोलताना सांगितलं. गुरुग्राममध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5/6
या प्रकरणाची पहिली सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आकांक्षाने या प्रकरणासंदर्भात जाहीरपणे आतापर्यंत काहीही सांगितलेलं नाही, मात्र तिची वकील स्वाती सिंहने वृत्ताला दुजोरा दिला आहे.
6/6
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंह, त्याचा भाऊ जोरावर सिंह आणि आई शबनम सिंह यांच्या विरोधात कौटुंबिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जोरावर सिंहची पत्नी आकांक्षा शर्माकडून ही तक्रार करण्यात आली.