एक्स्प्लोर
'फोर्ब्ज'च्या 100 श्रीमंतांच्या यादीत सलमानची शाहरुखवर मात

1/11

221.57 कोटी रुपये एवढ्या कमाईसह शाहरुख दुसऱ्या स्थानावर आहे. तर प्रसिद्धीच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.
2/11

प्रसिद्धीच्या बाबतीत 50 वर्षीय सलमानला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने मागे टाकलं आहे. सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये विराट पहिल्या तर सलमान दुसऱ्या स्थानावर आहे.
3/11

फोर्ब्जच्या 100 श्रीमंतांच्या यादीत दीपिका पादुकोण, सचिन तेंडुलकर, प्रियंका चोप्रा, ऋतिक रोशन आणि अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे.
4/11

सलमानचा 'सुलतान' आणि 'प्रेम रतन धन पायो' हे दोन्ही सिनेमे सलमान या यादीत पहिल्या स्थानावर येण्याचं कारण फोर्ब्जने सांगितलं आहे.
5/11

टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीची कमाई 122.48 कोटी रुपये आहे, तर त्याचा प्रसिद्धीच्या यादीत चौथा क्रमांक लागला आहे. यावर्षी त्याच्या जीवनावर आधारित 'धोनी : दी अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचं त्याच्या कमाईमध्ये मोठं योगदान आहे.
6/11

कॉमेडीस्टार कपिल शर्माने 100 प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत सातवं स्थान मिळवलं आहे. मागच्या वर्षीच्या यादीत कपिल 27 व्या स्थानावर होता. त्याने यावर्षी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण यांनाही मागे टाकलं आहे. तर कमाईच्या यादीत कपिल 11 व्या स्थानावर आहे. यामध्ये त्याने रणवीर सिंह, ए. आर. रहमान, आमीर खान यांनाही मागे टाकलं असून त्याची अंदाजे वार्षिक कमाई 30.17 कोटी रुपये आहे. कपिलने सलग पाचव्यांदा फोर्ब्जच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
7/11

फोर्ब्जने आपल्या पाचव्या सर्वात श्रीमंत 100 सेलिब्रिटींच्या यादी दोन निकषांवर निवडली आहे. यामध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2016 या काळातील मनोरंजन क्षेत्रातील कमाई आणि प्रसिद्धीचं मुल्यांकन केलं आहे.
8/11

फोर्ब्जच्या यादीत असलेल्या 100 भारतीयांनी बॉलिवूडसोबतच इतर क्षेत्रातूनही दमदार कमाई केली आहे.
9/11

फोर्ब्जच्या म्हणण्यानुसार सलमानची अंदाजे वार्षिक कमाई 100 सेलिब्रिटींच्या कमाईच्या सरासरी 9.84 टक्के एवढी आहे.
10/11

अभिनेता सलमान खानने फोर्ब्जच्या 100 श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुखला मागे टाकत पहिलं स्थान काबिज केलं आहे. सलमानचं अंदाजे वार्षिक उत्पन्न 270.33 कोटी रुपये आहे. या यादीत विराट कोहली, अक्षय कुमार, धोनी यांच्यासह अनेकांची नावं आहेत.
11/11

वार्षिक 203.03 कोटी रुपये कमाई आणि प्रसिद्धीच्या बाबतीत 11 व्या स्थानावर असलेल्या अक्षय कुमारने श्रीमंतांच्या यादीत चौथं स्थान मिळवलं आहे. अक्षय कुमारच्या कमाईमध्ये रुस्तम, एअरलिफ्ट, हाऊसफुल 3 हे सिनेमे आणि जाहिरातींचा समावेश आहे.
Published at : 23 Dec 2016 10:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
अमरावती
चंद्रपूर
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
