भारत 1996 अटलांटा ऑलिम्पिकपासून प्रत्येकवेळेस पदक पटकावत आलं आहे. पण यंदा भारताला पदक मिळणार की नाही असं वाटत असतानाच साक्षीनं देशाला रिओत पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं. 1992 बार्सीलोनामध्ये भारताला खाली हात परतावं लागलं होतं.
4/9
बीजिंग ऑलिम्पिकपासून भारतानं कुस्तीमध्ये चांगली कामगिरी सुरु ठेवली आहे. बीजिंगमध्ये सुशीलनं कांस्य पदक पटकावलं होतं. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यानं रौप्य पदक पटकावलं होतं. तर तेव्हाच योगेश्वर दत्तनं कांस्य पदकांची कमाई केली होती. तर रिओ ऑलिम्पिकमध्ये आता कुस्तीपटू साक्षीनं कांस्य पदक पटकावलं आहे.
5/9
ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी मलिक ही आजवरची केवळ चौथीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी कर्णम मल्लेश्वरीनं 2000 साली सिडनीत झालेल्या स्पर्धेत वेटलिफ्टिंगचं कांस्यपदक जिंकलं होतं. तर बॉक्सर मेरी कोम आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल या दोघींनही 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.
6/9
खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल होतं. तर सुशीलकुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. 2012 सालीच योगेश्वर दत्तनंही कांस्यपदक पटाकवलं होतं.
7/9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साक्षी मलिक ही पहिलीच भारतीय महिला पैलवान ठरली आहे. तर कुस्तीतल भारताचं हे आजवरचं पाचवं पदक ठरलं.
8/9
या सामन्यात साक्षी मलिक पहिल्या फेरीत पाच गुणांनी पिछाडीवर होती. पण दुसऱ्या फेरीत साक्षीनं जबरदस्त कमबॅक करुन 5-5 अशी बरोबरी साधली. मग सामन्याच्या अखेरच्या दहा सेकंदात साक्षीनं तीन गुणांची कमाई करुन 8-5 अशी आघाडी घेतली आणि भारताला कांस्यपदक जिंकून दिलं.
9/9
भारताची पैलवान साक्षी मलिकनं महिलांच्या 58 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. कांस्यपदकाच्या लढतीत साक्षीनं किर्गिस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हवर 8-5 अशी मात केली.