एक्स्प्लोर
ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशरबद्दल तुम्हाला काय माहित आहे?
1/6

पावसाळा संपता संपता, ओडीकेएफही आपल्या पिलांना घेऊन पुन्हा दक्षिणेकडे उडून जातो. अगदी लाजाळू असणारा हा पक्षी घनदाट जंगलात राहणंच पसंत करतो. काही वर्षापूर्वी दक्षिणेतून कोकणात येणाऱ्या ओडीकेएफच्या जोड्यांची संख्या जास्त होती. मात्र मानवी वावर, निसर्गाला पोहचलेली हानी आणि पर्यटकांची पर्यटनस्थळांवरील गोंगाट, मस्ती यामुळं हा पक्षी आता शोधावा लागतो. अनेक पक्षीप्रेमींना याचा फोटो घेणं म्हणजे जग जिंकण्यासारखं असतं. त्यामुळं ते निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर तिथलंच होऊन जातात. आपल्यामुळं वन्यप्राणी, पक्ष्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. तरच ही वनसंपदा आहे तशा रुपात आपल्या पुढच्या पिढ्यांनाही अनुभवता येईल.
2/6

यावेळी पिलांना खाद्याची खूप जास्त गरज असते. खंड्या जंगलातून पाल, सरडे, बेडूक, मधमाशा, छोटे कीटक आणून या पिलांना भरवतो. अवघ्या 20 दिवसात या पिलांचं वजन चांगलंच वाढतं. आणि महिनाभरात ही पिलं उडण्याजोगी होतात.
Published at : 04 Jul 2018 12:20 PM (IST)
View More























