Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 30 Jun 2016 11:30 PM (IST)
1/6
बंगळुरु बुल्सकडून रोहित कुमारने सहा गुणांची कमाई केली. प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत जयपूर पिंक पँथर्स नऊ गुणांसह तिसऱ्या, तर बंगळुरु बुल्स आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.
2/6
जयपूरसाठी जसविर सिंहने सर्वाधिक नऊ गुणांची कमाई केली. तर राजेश नरवालने सहा गुण वसूल करुन जयपूरच्या विजयाला हातभार लावला.
3/6
मग बंगळुरु बुल्सच्या अखेरच्या चढाईत रोहित कुमारला पकडून जयपूर पिंक पँथर्सने सामना 28-28 असा बरोबरीत सोडला.
4/6
खरंतर बंगळुरु बुल्सचा संघ अखेरच्या मिनिटापर्यंत 28-25 असा तीन गुणांनी आघाडीवर होता. पण जसविरने दोन्ही चढायांमध्ये प्रत्येकी एक गुण आणून बंगळुरुची आघाडी 28-27 अशी एका गुणावर आणली.
5/6
प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात टाय झालेला हा दुसरा सामना ठरला.
6/6
जसविर सिंहने अखेरच्या मिनिटात जबरदस्त झुंज दिल्याने जयपूर पिंक पँथर्सला बंगळुरु बुल्सविरुद्धचा सामना 28-28 असा बरोबरीत रोखता आला.