एक्स्प्लोर
गुडघा रक्ताने माखलेला, तरीही वॉटसन चेन्नईच्या विजयासाठी लढला!

1/6

अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 149 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरादाखल चेन्नईला 148 धावाच करता आल्या. चेन्नईला अखेरच्या षटकात 9 धावा हव्या होत्या. पण मुंबईचा अनुभवी गोलंदाज मलिंगासमोर चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. यासोबतच मुंबई इंडियन्स हा चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावणारा पहिलाच संघ ठरला.
2/6

परंतु शेन वॉटसनने ही गोष्ट संघांतील कोणत्याही खेळाडूला सांगितली नाही आणि तो फलंदाजी करत राहिला. बाद झाल्यानंतर तो पॅव्हिलियनमध्ये परतल्यानंतर संघाला या गोष्टीची जाणीव झाली. सामन्यानंतर शेन वॉटसनच्या पायात सहा टाके घालण्यात आले
3/6

शेन वॉटसन चेन्नईच्या संघातर्फे सलामीला आला होा आणि अखेरच्या षटकात तो धावचीत झाला. त्याने 59 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी रचली. चेन्नईचा तो एकमेव फलंदाज होता, ज्याने संघाच्या विजयासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला. पण 20व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कृणाल पंड्याने त्याला धावचीत केलं.
4/6

फिरकीपटू हरभजनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटर लिहिलं आहे की, रिस्पेक्ट भावा, व्हॉट अ लिजंड, शेन वॉटसनने संघासाठी, घाम, रक्त आणि सगळं काही दिलं. प्रेरणादायी."
5/6

आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा समारोप झाला आहे. अटीतटीच्या सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्जला एका धावेने पराभूत करुन विजेतेपद पटकावलं. पण या रोमांचक सामन्यात चेन्नईच्या शेन वॉटसनची अशी कहाणी समोर आली आहे, जी ऐकल्यावर क्रिकेट चाहत्यांना त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
6/6

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शेन वॉटसनने अंतिम सामन्यात 80 धावांची खेळी रचली, पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. पण वॉटसनच्या पायाला दुखापत झाली होती. रक्त वाहत असूनही तो फलंदाजी करत राहिला, असा खुलासा चेन्नई संघातील वॉटसनचा सहकारी हरभजन सिंहने केला आहे.
Published at : 14 May 2019 01:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion