नॉटिंगहॅमच्या वन डेत भारताच्या विजयाचा पाया चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं घातला. त्यानं २५ धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून, हा सामना भारताच्या बाजूनं झुकवला. वन डे क्रिकेटच्या इतिहासात 25 धावा देऊन सहा विकेट घेणारा कुलदीप जगातला पहिला डावखुरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉगच्या (5/32 वि. वेस्ट इंडिज, जानेवारी 2005) नावावर होता.
2/9
त्यानंतर रोहितच्या साथीला कर्णधार विराट कोहली आला. रोहित-विराटने दुसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. विराट 82 चेंडूत 75 धावा करुन माघारी परतला.
3/9
जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोनं ७३ धावांची सलामी देऊन इंग्लंडच्या डावाचा भक्कम पाया रचला होता. पण कुलदीप यादवनं त्या दोघांसह ज्यो रूटचाही काटा काढला.
4/9
मग स्टोक्स आणि बटलरनं अर्धशतकं झळकावून इंग्लंडच्या डावाला पुन्हा मजबुती दिली. पण कुलदीप यादवनं त्या दोघांसह डेव्हिड विलीलाही माघारी धाडलं.त्यामुळं टीम इंडियाला इंग्लंडला २६८ धावांत रोखता आलं.
5/9
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत शतक ठोकणाऱ्या रोहित शर्माने नॉटिंगहॅम वन डेत आपल्या कारकीर्दीतलं अठरावं शतक साजरं केलं. त्याच्या शतकाने टीम इंडियाचा 269 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणखी सोपा झाला. रोहितने इंग्लंड दौऱ्यावरचं हे दुसरं शतक ठरलं. त्याने ब्रिस्टलच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यातही शतक झळकावलं होतं. नॉटिंगहॅम वन डेत रोहितने 83 चेंडूंत 12 चौकार आणि तीन षटकारांसह शतक झळकावलं. या सामन्यात त्याने 114 चेंडूंत नाबाद 137 धावांची खेळी उभारली, ज्यामध्ये 15 चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.
6/9
यानंतर मग फलंदाजीसाठी भारताकडून सलामीला शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. धवन 40 धावा करुन माघारी परतला.
7/9
भारताने पहिला सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
8/9
विराट कोहलीच्या टीम इंडियानं नॉटिंगहॅमच्या पहिल्या वन डेत इंग्लंडचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडनं भारताला विजयासाठी २६९ धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानं ५५ चेंडू आणि आठ विकेट्स राखून इंग्लंडवर मात केली.
9/9
कुलदीप यादवनं रचला पाया, रोहित शर्मा झालासे कळस असं भारताच्या या विजयाचं वर्णन करता येईल. कुलदीप यादवनं सहा विकेट्स घेऊन आणि रोहित शर्मानं नाबाद १३७ धावांची खेळी उभारून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.