एक्स्प्लोर
जायराच्या समर्थनार्थ आता गंभीरही मैदानात

1/6

दंगलमधील जायराच्या अभिनयाला मुस्लीमविरोधी ठरवणं आणि मेहबुबा मुफ्तींच्या भेटीवरुन राजकारण करणं हे चुकीचं आहे. शिवाय तिला याबद्दल माफी मागावी लागते, हे सुद्धा लाजिरवाणं आहे, असं ट्वीट गंभीरने केलं आहे.
2/6

'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसिम आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या भेटीवरुन सोशल मीडियावर 'दंगल' सुरु झाली आहे. जायराने या भेटीनंतर जाहीर माफीनामाही दिला. मात्र तिच्यावर टीकेची झोड सुरुच आहे. त्यातच आता अनेक दिग्गज तिच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
3/6

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरही जायराच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.
4/6

गंभीर अगोदर पैलवान गीता फोगाटनेही जायराचं समर्थन केलं होतं. ती धाकड गर्ल आहे, त्यामुळे तिला माफी मागण्याची गरज नाही, असं गीता म्हणाली होती.
5/6

पुरुष हे पुरुष असतात. जायरासारखी मुलगी पुढे जात असल्याचं पाहून काही जणांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे 'म्हारी छोरियां आज भी छोरों से कम हैं', असं दुर्दैवाने म्हणावं लागत आहे, असंही गंभीरने ट्वीट केलं आहे.
6/6

जायराच्या प्रकरणात स्त्री-पुरुष भेद स्पष्ट जाणवतोय. कुणी आमीर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या बाबतीत अशी हिंम्मत करु शकतं का, असा सवालही गंभीरने केला आहे.
Published at : 17 Jan 2017 04:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
