एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Coronavirus | शाहीन बाग आंदोलनावर पोलिसांची कारवाई
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24193448/000_1Q47EE.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![देशभरातून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला प्रचंड विरोध करण्यात आला होता. देशभरातील या कायद्याविरोधातील अनेक आंदोलनांचं शाहीनबाग केंद्र बनलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192933/000_1Q47JV.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरातून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला प्रचंड विरोध करण्यात आला होता. देशभरातील या कायद्याविरोधातील अनेक आंदोलनांचं शाहीनबाग केंद्र बनलं होतं.
2/10
![मोदी सरकारने याचवर्षी नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं होतं. दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या सहिनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192928/000_1Q47JD.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोदी सरकारने याचवर्षी नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं होतं. दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या सहिनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं होतं.
3/10
![आंदोलनकर्त्यांना हटवल्यानंतर शाहीन बाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192922/000_1Q47J5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंदोलनकर्त्यांना हटवल्यानंतर शाहीन बाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
4/10
![शाहीन बाग व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी जामिया, सीलमपूर, जाफराबाद, तुर्कमान गेट, मालवीय नगर, हौज रानी येथूनही आंदोलकांना हटवलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192916/000_1Q47II.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहीन बाग व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी जामिया, सीलमपूर, जाफराबाद, तुर्कमान गेट, मालवीय नगर, हौज रानी येथूनही आंदोलकांना हटवलं आहे.
5/10
![नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192911/000_1Q47ID.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.
6/10
![कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईला काही आंदोलकांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192904/000_1Q47EE.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईला काही आंदोलकांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
7/10
![अखेर आज आंदोलनाच्या 101व्या दिवशी सकाळी दिल्ली पोलिसांनी शाहीनबाग येथे कारवाई करत आंदोलकांना घटनास्थळावरून हटवले. तसेच आंदोलनस्थळी असलेले तंबूही काढले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192858/000_1Q47EB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अखेर आज आंदोलनाच्या 101व्या दिवशी सकाळी दिल्ली पोलिसांनी शाहीनबाग येथे कारवाई करत आंदोलकांना घटनास्थळावरून हटवले. तसेच आंदोलनस्थळी असलेले तंबूही काढले.
8/10
![दिल्लीमध्ये एकूण आठ ठिकाणांवरील आंदोलकांना हटवण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192852/000_1Q47E1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीमध्ये एकूण आठ ठिकाणांवरील आंदोलकांना हटवण्यात आलं आहे.
9/10
![नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192846/000_1Q47DW.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
10/10
![कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस आणि प्रशासनाने केली होती. मात्र सर्व विरोध झुगारुन देत येथील महिलांनी हे आंदोलन सुरू ठेवले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/24192840/000_1Q47DU.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस आणि प्रशासनाने केली होती. मात्र सर्व विरोध झुगारुन देत येथील महिलांनी हे आंदोलन सुरू ठेवले होते.
Published at : 24 Mar 2020 02:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)