मुख्यपृष्ठPhotosदहा वर्षांच्या नात्याला नाव मिळणार, सायना-कश्यप लग्नगाठ बांधणार
दहा वर्षांच्या नात्याला नाव मिळणार, सायना-कश्यप लग्नगाठ बांधणार
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 26 Sep 2018 11:27 AM (IST)
1/7
भारताची फुलराणी सायना नेहवाल लवकरच आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. सायना नेहवाल वर्षअखेरीस विवाहबंधनात अडकणार आहे.
2/7
28 वर्षीय बॅडमिंटन स्टार सायना जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. तर 32 वर्षीय पी. कश्यप जागतिक क्रमवारीत 57 क्रमांकावर आहे.
3/7
मात्र आता दोघांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
4/7
आम्ही केवळ चांगले मित्र असून प्रॅक्टिस पार्टनर आहोत, असं ते सांगायचे. सोशल मीडियावर दोघे फोटो शेअर करायचे, पण त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी ना कोणी असायचं.
5/7
सायना आणि कश्यप जवळपास दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. परंतु दोघांनी कधीही याला दुजोरा दिला नव्हता.
6/7
16 डिसेंबरला होणाऱ्या लग्नसोहळ्यात केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनाच आमंत्रण देण्यात आलं आहे. तर २१ डिसेंबरला भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
7/7
बॅडमिंटनपटू पारुपली कश्यपसोबत 16 डिसेंबर रोजी सायना लग्नगाठ बांधणार आहे.