एक्स्प्लोर
71वा प्रजासत्ताक दिवस : राजपथावर चित्ररथांचे अनोखे प्रदर्शन, महान संस्कृतीचे दर्शन
1/16

उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर, राज्यातील सांस्कृतिक कला आणि धार्मिक पर्यटन दाखवण्यात आले. यात गंगा-यमुना वाहताना दाखवण्यात आल्या होत्या.
2/16

तेलंगणाच्या चित्ररथावर बतुकम्मा देवीची मूर्ती साकारण्यात आली होती. तसेच बतुकम्मा उत्सव देखील दाखवण्यात आला.
3/16

तामिळनाडूच्या चित्ररथावर आयन्नार देवतेची मूर्ती साकारण्यात आली होती. या देवीची मूर्ती वाईट प्रवृत्तीपासून रक्षण करते, अशी लोकांची धारणा आहे.
4/16

राजस्थानचा चित्ररथ परंपरा आणि संस्कृती यावर केंद्रित होता. यात गुलाबी शहर जयपूर आणि वास्तुकलेचे प्रदर्शन दाखवण्यात आले.
5/16

पंजाबच्या चित्ररथावर गुरुद्वाराला एका मजबूत स्तंभाच्या रुपात दाखवण्यात आले. किरत करो, नाम जपो हा सिद्धांत यातून देण्यात आला.
6/16

ओडिशाच्या चित्ररथावर भगवान शिव आणि भगवान विष्णू होते. भगवान लिंगाराजाची रुकुना रथ यात्रेची झलकही यावर पाहायला मिळाली. तर, कलाकार ओडिसी नृत्य करताना दिसले.
7/16

मेघालयातील चित्ररथावर निसर्गाशी माणसाने साधलेला ताळमेळ दाखवण्यात आला. इथे लोक झाडांच्या मदतीने पुल बांधतात ज्याला "जिंगकिंग डिंगरी" असं म्हणतात. निसर्गसंपन्न अशा या चित्ररथाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं.
8/16

मध्य प्रदेशचा चित्ररथ आदिवासी संस्कृतीवर केंद्रित होता. भिल्ल समाजातील स्त्रियांचा यात समावेश होता.
9/16

कर्नाटकच्या चित्ररथावर बसवेश्वराचे दर्शन आणि मंडप साकारण्यात आला होता.
10/16

जम्मू-काश्मीरच्या चित्ररथावर काश्मिरी घराची झलक पाहायला मिळाली. पारंपरिक कला संस्कृती आणि चलो गाव हा नाराही यात देण्यात आला.
11/16

कुल्लूचा प्रसिद्ध दसरा उत्सव हिमाचल प्रदेशच्या चित्ररथावर दिसत होता.
12/16

गुजरातच्या चित्ररथावर गाव साकरण्यात आलं होतं. हा चित्ररथ राणीच्या बावडीवर केंद्रीत होता.
13/16

गोव्याच्या चित्ररथाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. गोवा सरकार सध्या "बेडूक वाचवा" अभियान राबवित आहे. त्याच धर्तीवर बेडकाच्या हातात गिटार दाखवण्यात आली होती.
14/16

छत्तीसगडचा चित्ररथ यावेळी सर्वात पुढे होता. या रथावर नंदी व आदिवासी महिलेची मूर्ती साकरण्यात आली होती.
15/16

बांबू आणि वेतापासून बनवलेल्या वस्तू आसामच्या रथावर दिसत होत्या. सोबतच भोरताल नृत्याचंही सादरकरण करण्यात आले.
16/16

आंध्र प्रदेशच्या रथावर यंदा तिरुपती ब्रह्मोत्सवाची झलक साकारण्यात आली होती.
Published at : 26 Jan 2020 02:41 PM (IST)
View More























