एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 7 हजार धावा ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
2/14
कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या अचानक कसोटी निवृत्तीनंतर विराटला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत विराटने टीम इंडियाला अव्वल स्थानी आणलं.
3/14
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आज 28 वा वाढदिवस आहे. विराटने अत्यंत कमी वयात क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
4/14
सर्वात जलद 20 शतक ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
5/14
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
6/14
कर्णधार म्हणून लागोपाठ तीन शतक ठोकणारा विराट पहिलाच कर्णधार आहे.
7/14
विराटने 2006 मध्ये पहिला रणजी सामना वडिलांचं निधन झालं त्या दिवशी खेळला. या सामन्यात विराटने 90 धावा केल्या होत्या.
8/14
कर्णधार म्हणून दोन द्विशतक ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
9/14
विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र विराटचा पहिला क्रश अभिनेत्री करिष्मा कपूर होती. लहानपणापासून करिष्मा आपल्याला आवडते, असं विराटने अनेकदा सांगितलं आहे.
10/14
विराट कोहलीचं नाव 'चिकू' आहे. सचिन तेंडुलकरपासून टीम इंडियाचे सर्व खेळाडू विराटला चिकू नावानेच बोलावतात.
11/14
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या या महान खेळाडूंनंतर 26 वे शतक ठोकण्याचा मान विराटला मिळाला आहे.
12/14
आयपीएलमध्येही विराटच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
13/14
विराट आपलं सामाजिक भानही जपतो. गरिबांसाठी 'विराट कोहली फाऊंडेशन' ही एनजीओ विराट चालवतो.