एक्स्प्लोर
12 डिसेंबर : दिग्गजांचा जन्मदिन असलेला दिवस
1/8

मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व अन् दमदार नेतृत्व म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. या वयातदेखील पवारांचा झंझावात कायम आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं मोठं काम शरद पवारांनी केलं. वाढदिवसानिमित्त राज्यातून आलेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांना शरद पवार मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेटणार आहेत.
2/8

शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री असा पल्ला गाठणाऱ्या शरद पवार यांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान अढळ आणि महत्त्वाचं आहे. केवळ राजकारणच नाही तर क्रिकेटचं मैदानही पवारांनी गाजवलं. पवार 2005 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यानंतर 2010 मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
Published at : 12 Dec 2019 09:53 AM (IST)
View More























