ऑलिम्पिकच्या धरतीवर मास्टर्स स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 49 वर्षे वयाची मर्यादा आहे.
2/8
या स्पर्धेत मन कौर यांच्या पेक्षाही एक वर्षाने मोठा असणाऱ्या म्हणजेच 101 वर्षाच्या वृद्ध खेळाडूचा समावेश होता.
3/8
मन कौर यांचा फिटनेस या वयातही चांगला आहे. कसलाही शारीरिक त्रास त्यांना नाही. याच बळावर त्यांनी जगभरातील विविध स्पर्धात आतापर्यंत 20 पदक जिंकले आहेत. यातील अनेक स्पर्धा त्यांच्याच शहरात म्हणजे चंदीगडमध्येही झाल्या आहेत, अशी माहिती गुरुदेव सिंह यांनी सांगितलं.
4/8
मन कौर यांनी 100 मीटरचं अंतर 1 मिनीट 21 सेकंदात पार केलं. वयाच्या 93 व्या वर्षापासून त्या धावण्याची तयारी करत होत्या, असं त्यांचा मुलगा गुरुदेव सिंह यांनी सांगितलं.
5/8
या विजयामुळे मन कौर यांना आनंद असून मायदेशात परतण्याची उत्सुकता लागली आहे, असं मन कौर यांचा 78 वर्षीय मुलगा गुरुदेव सिंह यांनी सांगितलं.
6/8
मन कौर यांनी 100 वयोगटाच्या स्पर्धेत ही कामगिरी केली. मात्र 70-80 वयोगटातील धावपटूंसाठी देखील त्या आदर्श उदाहरण बनल्या आहेत.
7/8
इंग्लंडमध्ये अमेरिकन मास्टर्स स्पर्धा चालू आहे. त्यामध्ये मन कौर यांनी भारताची मान परदेशात उंचावण्याचं काम केलं आहे.
8/8
एका जिद्दी महिलेने धावण्याच्या स्पर्धेत वयाच्या 100 व्या वर्षी तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. मन कौर असं त्यांचं नाव असून 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी केली.