संघाच्या वाट्याला आलेल्या या विजयाचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. मुख्य म्हणजे नव्या जोमाच्या खेळाडूंना सोबत घेत अजिंक्य रहानेनं गाजवलेलं कर्णधारपद हे या कसोटीचं मुख्य आकर्षण ठरलं. ( छायाचित्रं सौजन्य- indiancricketteam/ इन्स्टाग्राम)
3/12
एकामागून एक विकेट गेल्यामुळं पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया आक्रमक पकड आणखी घट्ट करणार अशा स्थितीत असतानाच पुन्हा एकदा अतिशय आत्मविश्वासानं भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना मोजून मापून काही फटले लगावले आणि हा विजय निश्चित केला. ( छायाचित्रं सौजन्य- indiancricketteam/ इन्स्टाग्राम)
4/12
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनी संघाचा आधार होत एक प्रकारे काही क्षणांना आक्रमक होणाऱ्या युवा खेळाडूंना त्यांच्या संयमानं साथ दिली. ( छायाचित्रं सौजन्य- indiancricketteam/ इन्स्टाग्राम)
5/12
युवा गोलंदाजांनी बलाढ्य आणि कमालीच्या आत्मविश्वाच्या बळावर मायदेशीच खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियापुढं आव्हानं उभी केली. ( छायाचित्रं सौजन्य- indiancricketteam/ इन्स्टाग्राम)
6/12
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही अनुभवाच्या बळावर भारतीयांचं आव्हान पेललं. किंबहुना पावलोपावली त्यांनी भारतीय क्रिकेट संघापुढं आक्रमक पवित्राही घेतला. ( छायाचित्रं सौजन्य- indiancricketteam/ इन्स्टाग्राम)
7/12
चौथ्या आणि अखेरच्या निर्णायक दिवशी भारतीय फलंदाजांचा डाव मधल्या सत्रात सावरला. तर, शेवटच्या काही मिनिटांमध्ये विजयासाठी काही धावांची आवश्यकता असतानाच संघ कोलमडताना दिसला. ( छायाचित्रं सौजन्य- indiancricketteam/ इन्स्टाग्राम)
8/12
एकिकडून ऑस्ट्रेलिया फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्वच बाबतींत आक्रमक भूमिकेत दिसत असताना भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंनी संयमी खेळाचं प्रदर्शन केलं. ( छायाचित्रं सौजन्य- indiancricketteam/ इन्स्टाग्राम)
9/12
अजिंक्य रहाणेच्या संयमी नेतृत्त्वशैलीच्या बळावर पहिल्या दिवसापासून संघातील खेळाडूंनी आश्वासक कामगिरीचं प्रदर्शन केलं. ( छायाचित्रं सौजन्य- indiancricketteam/ इन्स्टाग्राम)
10/12
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय क्रिकेट संघानं दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरच त्यांना मात दिली. (छाया सौजन्य- ट्विटर)
11/12
ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये बहुतांश नव्या खेळाडूंच्या बळावर संघ (Gabba) मैदानात उतरला. (छाया सौजन्य- ट्विटर)
12/12
IND vs AUS, India Wins Gabba Test भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळं काही मोठी नावं चौथ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आली.