राशीनंही या नात्याच्या चर्चा निव्वळ अफवा अल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं आता बुमराह खरंच विवाहबंधनात अडकणार असेल तर त्याही होणारी जोडीदार आहे तरी कोण, हेच जाणून घेण्यासाठी क्रीडारसिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- Instagram/@rashikhanna_official)
2/7
जसप्रीत बुमहारचं नाव आणखी एका तेलुगू अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे राशी खन्ना. (छाया सौजन्य- Instagram/@rashikhanna_official)
3/7
क्रिकेट प्रेझेंटर संजना गणेशन हिचं नावही बुमराहशी जोडलं गेलं होतं. मागील काळात तीनं अनेक सामन्यांसाठी काम केलं आहे. केकेआर फॅन शो या स्टार स्पोर्ट्सच्या शोचाही ती एक भाग होती. (छाया सौजन्य- Instagram/@sanjanaganesan)
4/7
2020 मध्ये या अभिनेत्रीनं मात्र बुमराहशी आपलं नातं जोडलं जात असण्याच्या चर्चा केवळ अफवा आल्याचं म्हटलं होतं. किंबहुना तिनं अशा प्रकारे आपलं नाव जोडलं जाण्याबाबतनारजीही व्यक्त केली होती. (छाया सौजन्य- Instagram/@anupamaparameswaran96)
5/7
या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे अनुपमा परमेश्वरम. 'प्रेमम' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या या अभिनेत्रीचं नाव बुमराहशी जोडलं गेलं होतं. (छाया सौजन्य- Instagram/@anupamaparameswaran96)
6/7
लग्नाच्या चर्चांच्या धर्तीवर आता जसप्रीत बुमराहच्या काही तथाकथिक आणि चर्चेचा विषय ठरलेल्या प्रेमप्रकरणांची आणि त्याच्याशी नाव जोडल्या गेलेल्या अनेकांचीच पुन्हा नव्यानं चर्चा सुरु झाली आहे. (छाया सौजन्य- Getty Images)
7/7
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं काही खासगी कारणांसाठी इंग्लंडविरोधात खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली. खुद्द जसप्रीतनं यामागचं कारण स्पष्ट केलं नसलं तरीही बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, या दिवसाच्या तयारीसाठी त्यानं ही सुट्टी घेत असल्याचं कारण दिल्याचं म्हटलं जात आहे. (छाया सौजन्य- Getty Images)