एक्स्प्लोर
Test Records: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 पाच फलंदाज, दोन भारतीयांचा समावेश
संग्रहित छायाचित्र
1/5

सचिन तेंडुलकर : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, ज्याला 'लॉर्ड ऑफ क्रिकेट' म्हणून ओळखले जाते, त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. सचिनच्या 200 टेस्टमध्ये 53.78 च्या सरासरीने 15921 धावा आहेत. या दरम्यान, त्याच्या बॅटने 51 शतके आणि 68 अर्धशतके केली आहेत.
2/5

रिकी पाँटिंग : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाँटिंगने 168 कसोटींमध्ये 51.85 च्या सरासरीने 13378 धावा केल्या आहेत. या फॉर्मेटमध्ये त्याच्या बॅटने 41 शतके आणि 62 अर्धशतके केली आहेत.
3/5

जॅक कॅलिस- दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 166 कसोटीत 45 शतकांच्या मदतीने 13289 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 224 धावा होती.
4/5

राहुल द्रविड : 'द वॉल' आणि 'दीवार' म्हणून ओळखले जाणारे भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने 164 कसोटीत 52.31 च्या सरासरीने 13288 धावा केल्या आहेत. जरी तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, पण त्याच्या आणि कॅलिसमध्ये फक्त एक धावेचा फरक आहे. द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये 36 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत.
5/5

अॅलिस्टर कुक : इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सर अॅलिस्टर कुकच्या 161 कसोटींमध्ये 45.35 च्या सरासरीने 12472 धावा आहेत. कुकच्या नावावर 33 कसोटी शतके आहेत. त्याचबरोबर त्याची सर्वोच्च धावसंख्या 294 धावा होती.
Published at : 03 Sep 2021 11:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
क्रिकेट























