एक्स्प्लोर
In Pics : पहिला दिवस भारताचा, जाडेजा-अश्विनची कमाल गोलंदाजी, मग कॅप्टन रोहितची मजबूत फलंदाजी
IND vs AUS : कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला असून ऑस्ट्रेलिया 177 धावांवर सर्वबाद झाल्यावर भारताने दिवसाच्या अखेरीस 77 वर 1 बाद अशी धावसंख्या केली आहे.
IND vs AUS
1/10

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला आहे.
2/10

नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात हा पहिला कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवशीचा खेळ भारताच्या नावावर राहिला.
3/10

पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारत 77 वर 1 बाद अशी असून भारत 100 धावांनी पिछाडीवर आहे.
4/10

सामन्यात आधी फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 177 धावा केल्या.
5/10

भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली यावेळी जाडेजानं 5 तर अश्विन 3 विकेट्स घेतल्या.
6/10

त्यानंतर फलंदाजीला आल्यावर कॅप्टन रोहित आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी भागिदारी केली.
7/10

राहुल 20 धावा करुन बाद झाला. तर रोहित शर्मा नाबाद 56 आणि आर अश्विन नाबाद शून्य धावांवर क्रिजवर आहे.
8/10

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारतानं अप्रतिम गोलंदाजी करत हा डाव हाणून पाडला.
9/10

विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर मैदानात परतलेल्या जाडेजानं पाच विकेट्स घेत कमाल केली.
10/10

तसंच कॅप्टन रोहितनं अर्धशतक दिवसअखेरपर्यंत ठोकत एकप्रकारे दमदार पुनरागमन केलं आहे.
Published at : 09 Feb 2023 06:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















