राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 'वर्षा' या त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2/8
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
3/8
72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
4/8
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदान, सोलापूर येथे ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व उपस्थितांशी संवाद साधत त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
5/8
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त उस्मानाबाद( धाराशिव) जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदान,उस्मानाबाद(धाराशिव) येथे ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजास मानवंदना दिली व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
6/8
राज्याचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्क, दादर या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी राज्यपालांना राज्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.
7/8
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
8/8
अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.