सुशांत राजपूतचे वडिल के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या नातेवाईकांविरोधात पाटणा पोलीस ठाण्यात 25 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांनी रियावर फसवणूक केल्याचा आणि सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावला आहे. (Photo Credit: Manav Manglani)
2/5
असं सांगण्यात येत आहे की, आयटी क्षेत्राशी संबंधित असलेल्या सिद्धार्थने एक वर्षापूर्वी राजपूतसोबत राहत होता. सिद्धार्थने यापूर्वी मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. (Photo Credit: Manav Manglani)
3/5
सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि त्याच्यासोबत राहणारा सिद्धार्थ पिठानी याचीही ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. सिद्धार्थवरही सुशांतच्या वडिलांनी आरोप लावले आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
4/5
रिया चक्रवर्तीची मॅनेजर श्रुती मोदीची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. श्रुती मोदी सुशांत सिंह राजपूतसाठीही काम करत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती आणि मोदी यांचे जबाब ईडीने नोंदवून घेतले आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
5/5
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीने जवळपास 9 तासांपर्यंत चौकशी केली. यादरम्यान, रिया चक्रवर्तीने ईडीकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं रिया देऊ शकली नाही. रिया मुंबईमधील ईडी कार्यालयालयात भाऊ शौविकसोबत गेली होती. (Photo Credit: Manav Manglani)