एक्स्प्लोर
कोण आहेत YouTube चे नवे सीईओ नील मोहन!
भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन (Neal Mohan) यांची यूट्यूबचे (YouTube) नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive officer) म्हणून नियुक्ती झाली आहे.

Neal Mohan
1/11

भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन (Neal Mohan) यांची यूट्यूबचे (YouTube) नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2/11

सुसान व्होजिकी (Susan Wojcicki) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली. यूट्यूब हा जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
3/11

यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंक (Alphabet Inc) ने गुरुवारी (16 फेब्रुवारी) याबाबतची घोषणा केली.
4/11

नील मोहन यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर होते. नोव्हेंबर 2015 मध्ये ते यूट्यूबमध्ये रुजू झाले होते. नील मोहन यांच्या लिंक्डन प्रोफाइलनुसार त्यांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीतून एमबीए केले आहे.
5/11

त्यांनी करिअरची सुरुवात एक्सचेंर कंपनीसोबत केली होती. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सुसान यांनी एक खूपच चांगली टीम बनवली आहे.
6/11

नीलच्या रुपात त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे. ते येणाऱ्या दशकात यूट्यूबचे नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे.
7/11

YouTube चे CEO होण्यापूर्वी नील मोहन यांनी कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम केले. यापूर्वी, मोहन यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये देखील काम केलं आहे.
8/11

नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी जवळपास 15 वर्षे एकत्र काम केले आहे. नील मोहन आता अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत काम करतील.
9/11

सुंदर पिचाई हे देखील भारयी वंशाचे आहेत. नील मोहन यांच्या पत्नी हेमा सरीम मोहन या देखील भारतीय वंशाच्या आहेत.
10/11

याचबरोबर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अडोबचे सीईओ शंतनू नारायण आणि आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत.
11/11

यूट्यूब जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. नील मोहन सीईओबरोबरच यूट्यूबचे सीनियर व्हाइस-प्रेसिडेंटच्या भूमिकेतही असणार आहेत.
Published at : 17 Feb 2023 03:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
