एक्स्प्लोर
Best Smartphones : दमदार 6000mAh बॅटरी आणि 6 जीबी रॅम, 15 हजारहून कमी किमतीचे स्मार्टफोन्स
1/5

गेमिंगसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गेमिंगसाठी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी, स्मार्टफोनमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिक रॅम आणि पावरफुल बॅटरी. मोबाईलमध्ये या दोन्ही चांगल्या असल्यास आपण स्मार्टफोनमध्ये गेम सहजतेने खेळू शकतो. त्यामुळे अशा काही स्मार्टफोनची माहिती घेऊयात जे 6GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह येतात.
2/5

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंच HD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 700x1600 पिक्सेल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड One UI 3.1 वर काम करतो. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने त्याचे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी, सॅमसंग गॅलेक्सी एफ 22 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. सेकंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असून 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर 2 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर देण्यात आला आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 14,499 रुपये आहे.
Published at : 01 Sep 2021 11:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र























