बीएमडब्लूची (BMW) नवी 5 सीरिज आज भारतात लाँच करण्यात आली आहे. नवी कार तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. पेट्रोलमध्ये (BMW 530i M Sport) आणि दोन डिझेल कार (BMW 530d M Sport and BMW 520d Luxury Line) उपलब्ध आहेत. आजपासून सर्व बीएमडब्ल्यू डीलरशिपवर या कार बुकिंग करता येणार आहेत.
2/6
नव्या टेक्नॉलॉजीने सज्ज या कारमध्ये रिमोट कंट्रोल पार्किंग, बीएमडब्ल्यू हेड-अप डिस्प्ले, रिव्हर्सिंग असिस्टंट, पार्किंग असिस्टंट अशा अनेक ड्रायव्हर्स असिस्टंट सिस्टम आहेत.
3/6
नव्या लूकमध्ये बीएमडब्लूची ओळख असलेली समोरील ग्रिल मोठी आणि रुंद देण्यात आली आहे. हेडलॅम्प्सच्या डिझाईनमध्येही बदल करण्यात आले आहेत.
4/6
इंजिनबाबत बोलायचं तर BMW 530d M Sport and BMW 520d Luxury Line मध्ये डिझेल इंजिन आहे. तर BMW 530i M Sport मध्ये पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये चार सिलेंडर इंजिन आहेत जे 252 एचपी आणि 350 एनएम पावर जनरेट करतात. अवघ्या 6.2 सेकंदात ही कार 0-100 किमी स्पीड घेते.
5/6
बीएमडब्लूच्या या नव्या 5 सीरिजमध्ये इंटिरियर क्वालिटीदेखील शानदार आहे. आतमध्ये 12.3 इंचाची मोठी स्क्रीन आहे.
6/6
या कारच्या किमतीबाबत बोलायचं तर BMW 530i M Sport ची एक्स शोरुम किंमत 62,90,000 रुपये, BMW 520d Luxury ची किंमत 63,90,000 रुपये, तर BMW 530d M Sport ची एक्स शोरुम किंमत 71,90,000 रुपये आहे.