एक्स्प्लोर
PHOTO : तळकोकणातील मालवण समुद्रकिनाऱ्यावर नौकानयन स्पर्धा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव एकत्रित येत गाबित महोत्सवाचे मालवणमधील दांडी समुद्रकिनारी आयोजन केले. या महोत्सवात नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Sindhudurg Sailing Competition
1/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव एकत्रित येत गाबित महोत्सवाचे मालवणमधील दांडी समुद्रकिनारी आयोजन केले.
2/9

या महोत्सवात नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 14 संघांनी सहभाग दर्शवला होता.
3/9

प्राथमिक तीन आणि अंतिम एक अशा चार गटात ही स्पर्धा पार पडली.
4/9

श्री देव दांडेश्वर मंदिर ते श्री देव चौकचार श्रीकृष्ण मंदिरपर्यंतचे सागरी अंतर स्पर्धकांना पार करावे लागले.
5/9

स्पर्धेत अव्वल येण्यासाठी स्पर्धकांनी आपले वल्हवण्याचे कौशल्य आणि पूर्ण ताकद पणाला लावली.
6/9

स्पर्धेत सरस होण्यासाठी समुद्रात सुरु असलेली चुरस अतिशय रंगतदार ठरली.
7/9

पर्यटकांनीही नौकानयन स्पर्धेचा आनंद लुटला. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेस उपस्थिती दर्शवून नौकानयन कौशल्याचे कौतुक केले.
8/9

वायरी जाधववाडी येथील मंदार घारे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
9/9

झालझुलवाडीतील संजय गावकर संघाने द्वितीय तर देवबागमधील पंकज मालंडकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
Published at : 01 May 2023 09:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
