एक्स्प्लोर
Raj Thackeray - Amit Shah Meet : राज ठाकरे दिल्लीत अमित शाहांचा भेटीला!
Raj Thackeray - Amit Shah Meet : राज ठाकरे दिल्लीत अमित शाहांचा भेटीला!
राज ठाकरे दिल्लीत अमित शाहांचा भेटीला पोहचले. (Photo Credit : ABP MAJHA)
1/10

महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
2/10

आता त्यामध्ये मनसेचा समावेश होणार हे निश्चित झालं असून, त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट झाली. (Photo Credit : ABP MAJHA)
3/10

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. (Photo Credit : ABP MAJHA)
4/10

राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. (Photo Credit : ABP MAJHA)
5/10

मंगळवारी भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा पार पडली. (Photo Credit : ABP MAJHA)
6/10

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या भेटीला अत्यंत महत्व आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
7/10

राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीने मनसे आणि भाजप ही नवी युती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
8/10

अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
9/10

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात असं सांगितलं जातंय. (Photo Credit : ABP MAJHA)
10/10

दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणाहून मनसेचे बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. (Photo Credit : ABP MAJHA)
Published at : 19 Mar 2024 02:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























