एक्स्प्लोर
Pune Weather Update: सूर्याचा प्रकोप! पुण्यात तापमानाने 128 वर्षांचा विक्रम मोडला, वाचा आजचा हवामान अंदाज
Pune Weather Alert: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तापमानाने अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Pune Weather Alert
1/6

पुणे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीमध्ये आलं आहे. एप्रिलमध्ये पुण्याचे सरासरी कमाल तापमान चाळीशी पार कायम आहे. उष्णतेने पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत.
2/6

पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. लोहगावचा पारा गेले चार दिवस 43 अंशांवर गेल्याने यंदा 128 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे.
3/6

पुणे वेधशाळेच्या नोंदीनुसार, पुणे शहराचा पारा हा 30 एप्रिल 1897 नंतर म्हणजे तब्बल 128 वर्षांपूर्वी 43 अंशांवर गेला होता.
4/6

पुणे शहरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.आज पुण्यात कमाल तापमान 40° इतकं आहे, तर किमान तापमान 23° इतकं आहे.
5/6

पुण्यात तापमानाने 128 वर्षांचा विक्रम मोडला आहे. पुण्यात बुधवारी म्हणजेच 23 एप्रिलला 43.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
6/6

यापूर्वी 30 एप्रिल 1897 ला 43.3 तापमानाची नोंद झाली होती, त्यानंतर मात्र 128 वर्षांनी काल तापमानाने विक्रम मोडला आहे.
Published at : 24 Apr 2025 09:50 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत























