मुख्यपृष्ठफोटो गॅलरीबातम्याPune News: पुण्यात भरली मोदींच्या नावाची बाजारपेठ; राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनोखं आंदोलन
Pune News: पुण्यात भरली मोदींच्या नावाची बाजारपेठ; राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनोखं आंदोलन
By : शिवानी पांढरे | Updated at : 15 Jun 2022 04:25 PM (IST)
Pune
1/5
'मोदींंनी काय दिलं? गाजर दिलं.. गाजर दिलं...', अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पुण्यात महागाई विरोधात आंदोलन केलं.
2/5
देशात महागाईने उच्चांक गाठला असून यावर्षी महागाईचा उच्चांक मोडीत काढला असून या आठवड्यात घाऊक महागाई दर 15.88 वर गेला आहे.
3/5
हा गेल्या 9 वर्षांतील उच्चांक असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही कठीण परिस्थिती देशावर ओढावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात मोदी महागाई बाजार भरविण्यात आला होता.
4/5
पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात उभारण्यात आलेल्या भाजीपाला , फळे , फुलविक्रेता ,पुस्तक विक्रेता , शालेय साहीत्य , किराणा, चहा , वडापाव विक्रेता याचबरोबर मासळी बाजारासह “मोदी महागाई बाजार पेठची” चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
5/5
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांना देखील बसला आहे.