एक्स्प्लोर
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, समाज कल्याण आयुक्तांकडून पाहणी व आढावा
pune
1/8

पेरणे (ता. हवेली) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज रोजी कार्यक्रमस्थळाची पाहणी करुन कोविड-१९ च्या पाश्वभूमीवर सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
2/8

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य शासनाने समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणाची तयारी पूर्ण झाली आहे. सदर कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गृह विभागाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. डॉ. नारनवरे यांनी येणाऱ्या सर्व अनुयायांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Published at : 31 Dec 2022 10:34 PM (IST)
Tags :
'puneआणखी पाहा























