एक्स्प्लोर

Varuna Drone : चाकणच्या तरुणांनी तयार केले ड्रोन, दुर्गम भागात मदतकार्य पोहोचवणं सुलभ

Varuna Drone : दुर्गम भागात एखादी व्यक्ती अडकलीये, तिथं बचाव पथकाला पोहचणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तिथं ड्रोन पोहचलं अन त्याच ड्रोनमध्ये बसून त्या व्यक्तीची सुटका झाली तर....

drone

1/8
दुर्गम भागात एखादी व्यक्ती अडकलीये, तिथं बचाव पथकाला पोहचणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तिथं ड्रोन पोहचलं अन त्याच ड्रोनमध्ये बसून त्या व्यक्तीची सुटका झाली तर. हे वाचल्यावर तुम्हाला वाट्टेल आम्ही एखादी चित्रपटाची कथा सांगतोय.

2/8
पण आश्चर्यकारक वाटणारी कथा आता लवकरच सत्यात उतरणार आहे. हे सत्य वरुणा ड्रोनच्या माध्यमातून सर्वांना पाहता अन अनुभवता ही येणार आहे. कारण हा वरुणा ड्रोन इंडियन नेव्हीच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज होतंय.

3/8
त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वरुणा ड्रोनच प्रात्यक्षिक ही पार पडलंय. या आगळ्या-वेगळ्या ड्रोनची निर्मिती पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने या ड्रोनची निर्मिती केलीये.

4/8
चाकण एमआयडीसीचं आधीपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक आहे. आता त्यात सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने आणखी भर घातली आहे. सलग चार वर्षे परिश्रम घेत त्यांनी वरुणा ड्रोन साकारलं आहे.

5/8
इंडियन नेव्हिने त्यांच्यासमोर जे आव्हान ठेवलं होतं, ते आता सत्यात उतरत असल्याचं कंपनीचे सहसंस्थापक मृदुल बब्बर यांनी दिली. एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर एखादी वस्तू अथवा अगदी एखाद्या व्यक्तीला स्थलांतर करायचं आहे. त्यासाठी आम्हाला ड्रोन बनवून मिळेल का? असा प्रश्न नेव्हीने आमच्यासमोर उभा केला होता.

6/8
त्याचं उत्तर शोधत असताना आम्ही इथपर्यंत पोहचलोय. यासाठी अनेक कल्पना लढवत, वेगवेगळे प्रयोग साकारत हे वैशिष्ट्यपूर्ण ड्रोन निर्माण झालं. जे एक किमी उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकतं. 20 ते 25 किमी अंतर पार करतं. एकदा चार्ज केल्यास यातून 25 ते 30 मिनिटांचा प्रवास करता येतो.

7/8
अर्धा तासांत हे ड्रोन 36 किमीचं अंतर कापू शकतं. 130 किलो वजनाची व्यक्ती अथवा महत्वाची वस्तू स्थलांतर करू शकते. अति दुर्गम भागात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून स्वयंचलित, रिमोट अथवा कॉम्प्युटर अशा तीन पद्धतीने ऑपरेट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलीये. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आलीये. यासाठी ड्रोनमध्ये 16 मोटार बसविण्यात आल्यात, पैकी चार मोटार जरी बंद पडल्या तरी हे ड्रोन सुरक्षीत स्थळी पोहचू शकतं.

8/8
शिवाय मोटार ऑपरेट करणाऱ्या चार कॉम्प्युटर पैकी एक जरी खराब झालं तरी सुरक्षित प्रवास होऊ शकतो. विना इंधन केवळ बॅटरीवर हे उड्डाण घेत शिवाय एक नव्हे तर आठ बॅटरी ड्रोनमध्ये उपलब्ध आहेत. अशा या वैशिष्ट्यपूर्ण ड्रोनची पहिली चाचणी यशस्वी झाल्याचा दावा कंपनीचे इंजिनियर सौरभ पाटील यांनी केलाय.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget