एक्स्प्लोर
Mumbai : ना सिग्नल ना चौक, आता तिसऱ्या मुंबईची तयारी..
Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर सिडको रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर करणार असल्याचे सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.
Mumbai
1/11

मुंबई (Mumbai) नवी मुंबईनंतर (Navi Mumbai) आता तिसरी मुंबई म्हणून उदयास येणाऱ्या पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रूपये खर्च करून रस्ते उभारणार आहे.image 1
2/11

नैना क्षेत्र असलेल्या या 23 गावांचा झपाटयाने विकास व्हावा यासाठी सिडकोने हा धोरणात्मक निर्णय घेतला असून येत्या महिनाभरात या कामांचे टेंडर काढले जाणार आहेत.
3/11

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर सिडको रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर करणार असल्याचे सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांनी सांगितले. (Phato Credit : Unsplash)
4/11

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे.विमानतळाच्या पुर्वेला असलेल्या पनवेल , उरण तालुक्यातील 23 गावांचा विकास सिडको नैना योजनेअंतर्गत करणार आहे.(Phato Credit : Unsplash)
5/11

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे.विमानतळाच्या पुर्वेला असलेल्या पनवेल , उरण तालुक्यातील 23 गावांचा विकास सिडको नैना योजनेअंतर्गत करणार आहे.(Phato Credit : Unsplash)
6/11

सिडकोकडून नविन क्षेत्राचा विकास होताना एकसंघ न होता तुकड्या तुकड्यात केला जातो. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या भुखंडांना योग्य तो भाव मिळत नाही.(Phato Credit : Unsplash)
7/11

सिडको आता नैना भागातील 12 नोडची विकासकामे टप्याटप्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे.(Phato Credit : Unsplash)
8/11

संपूर्ण कामासाठी सिडकोला साधारण 12 करोड रूपये खर्च अपेक्षित आहे. (Phato Credit : Unsplash)
9/11

नैना क्षेत्रातील 1 ते 12 असे सर्वच टीपीएस योजनेतील रस्त्यांचे जाळे उभारणीसाठी मार्गातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.(Phato Credit : Unsplash)
10/11

रस्ते बांधताना कुठेही सिग्नल यंत्रणा किंवा चौक येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. (Phato Credit : Unsplash)
11/11

रस्ते सरळ रेषेत असतील आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथे उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवला जाणार आहे. यामुळे चौक आणि सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते सिडको तयार करणार आहे. (Phato Credit : Unsplash)
Published at : 20 Oct 2023 04:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















