एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2022 : गौरीच्या मूर्तीची जर्मनीत निर्मिती; नाशिकमधील सुंदर मूर्ती ठरतायत आकर्षण
Ganesh Chaturthi 2022 : नाशिकच्या शहाणे कुटुंबियांनी चक्क जर्मनीला महालक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्या आहेत.

Ganesh Chaturthi 2022
1/8

घरोघरी गौरी आवाहन झाले आहे. या निमित्ताने नाशिकच्या शहाणे कुटुंबियांनी आपल्या घरी गौरी-गणपतीची स्थापना केली आहे.
2/8

मात्र, या गौराई महाराष्ट्रातल्या नसून चक्क जर्मनीला महालक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. नाशिकच्या घरी सोनपावलांनी त्यांचे आगमन झाले आहे.
3/8

अत्यंत सुंदर, देखणं आणि अनोखं असं रूप या गौराईचं पाहायला मिळतं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेल्या माहेरवाशिणीच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळतो अगदी तसाच आनंद या गौरीकडे बघितल्यावर होतो.
4/8

पश्चिम जर्मनीतील एका कारागिराने चार महिने मेहनत घेत या मूर्ती साकारल्या आहेत. फायबरच्या जरी वाटत असल्या तरी त्या शिवण या भरीव लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत.
5/8

एका गौरीचे वजन हे जवळपास 80 किलो एवढे असून त्या 100 वर्ष टिकतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या गौराईंचे केस, डोळे, कान, ओठ हे अत्यंत हुबेहूब असे आहेत.
6/8

लक्ष्मीच्या डोळ्यांकडे तर किती वेळ बघतच रहावेसे वाटते.
7/8

मूर्तीवर सोने चांदीचे जवळपास 5 किलोहून अधिक दागिन्यांची आभूषणे असून मंगळसूत्र, राणीहार, कंबरपट्टा अशा प्रत्येक दागिन्यांनी महालक्ष्मी साकारण्यात आल्या आहेत.
8/8

गौरी गणपतीचे हे दृष्य अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
Published at : 04 Sep 2022 03:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
