एक्स्प्लोर
PHOTO: नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणेंचा राजकरणाला रामराम!

Nitesh Rane
1/8

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane Son Nilesh Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane Quits Politics) यांनी राजकरणाला रामराम केला आहे.
2/8

निलेश राणे यांनी ट्वीट करत निर्णय जाहीर केल्यामुळे चर्चांना सध्या ऊत आला आहे. निलेश राणे 2009 साली म्हणजे वयाच्या 28 व्या वर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Constituency) निवडून आले होते. राज्याच्या राजकरणातील सर्वात तरूण खासदार अशी त्यांची ओळख होती.
3/8

निलेश राणे यांचा जन्म मार्च 1981 साली झाला. निलेश राणे राज्याच्या राजकरणात नेहमीच कोणत्या ना कोणत्य कारणांनी चर्चेत असतात. निलेश राणे भारतीय जनता पार्टी मधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत.
4/8

ते 2009 साली पंधराव्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
5/8

निलेश राणे हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ह्यांचे पुत्र आहेत. निलेश राणे ह्यांचे भाऊ नितेश नारायण राणे विद्यमान महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत.निलेश राणे यांनी तत्त्वज्ञान विषयात Doctorate पदवी घेतली आहे.
6/8

त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले आहे. फेब्रुवारी 2008 साली त्यांना पदवी मिळाली आणि लगेच ते राजकरणात सक्रिय झाले.
7/8

निलेश राणे यांची प्रशासनावरील पकड, जनतेचा बळकट पाठिंबा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे आवडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. जनतेचे प्रश्न चुटकीसरशी सोडविण्यात ते तरबेज असल्याने जनपाठिंबा मोठा आहे.
8/8

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच स्वतः डॉक्टरेट असल्याने औद्योगिक क्षेत्रातील नामवंतांमध्ये आवडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.
Published at : 24 Oct 2023 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
नागपूर
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion