एक्स्प्लोर
Mumbai Landslide Vikhroli Parksite: साखरझोपेत असणारं मिश्रा कुटुंब दरडीखाली गाडलं गेलं, विक्रोळी पार्कसाईटमधील भयावह दृश्यं
Mumbai Rain Landslide news: मुंबईत मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली, दोघांचा मृत्यू. या दुर्घटनेत मिश्रा कुटुंब दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेमुळे पार्कसाईट परिसरात शोककळा.
Mumbai Landslide Vikhroli Parksite
1/10

मुंबईत काल रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
2/10

विक्रोळी पार्कसाईट वर्षा नगर विभागात असलेल्या डोंगराळ झोपडपट्टी मधील जनकल्याण सोसायटी येथे राहत असलेल्या मिश्रा कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री डोंगराचा मोठा भाग कोसळला.
3/10

या दुर्घटनेत शालू मिश्रा आणि सुरेशचंद्र मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
4/10

वर्षानगर ही पार्कसाइट विभागातील मोठी डोंगराळवस्ती असून इथे वारंवार अशा घटना घडत असल्याने नगरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या घटनास्थळी सर्व मलबा काढण्यात आला आहे. तसेच आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत.
5/10

पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली. पार्कसाईट (Parksite) या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. याठिकाणी डोंगरावर अनेक घरे आहेत. अनेक भागांमध्ये संरक्षक भिंत बांधूनही प्रत्येक पावसाळ्यात याठिकाणी दरड कोसळण्याचा (Landslide) धोका असतो.
6/10

मिश्रा कुटुंबाला पालिकेने घर सोडायला सांगितले होते. मात्र, मिश्रा कुटुंब तिकडेच वास्तव्याला होते.
7/10

हवामान खात्याने मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगराची माती भुसभुशीत होऊन आणखी एखादी दुर्घटना घडू नये, यादृष्टीने पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे.
8/10

या दुर्घटनेमुळे पार्कसाईट परिसरात शोककळा पसरली आहे.
9/10

रात्रीच्या अंधारात मातीचा ढिगारा खाली आला आणि घर गाडले गेले.
10/10

मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्यात आला आहे.
Published at : 16 Aug 2025 08:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























