वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं काही कठोर निर्बंध लागू केले. पण, हे नियम लागू करत असताना यातून जीवनावश्यक गोष्टींची दुकानं, भाजी मंडई, वगैरे वगळण्यात आली.
2/5
नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये हाच प्रशासनाचा हेतू होता. पण, याचाच गैरफायदा घेत नागरिकांनी मात्र पुन्हा एकदा बेजबाबदारपणाचं वर्तन करत कोरोना नियमांचं सर्सा उल्लंघन केलं आहे.
3/5
संचारबंदीचे नियम लागू असताना दादर भाजी मार्केट, फुल मार्केट येथे सकाळी सहा वाजता तुडूंब गर्दी पाहायला मिळाली.
4/5
इथं सोशल डिस्टन्सिंग दूरदूरपर्यंत दिसत नव्हतंच, पण सोबतच अनेकांच्या तोंडावर मास्कही नव्हता.
5/5
नागरिकांचा असाच बेजबाबदारपणा सुरु राहिल्यास, येत्या काळात मुंबईत आणि महाराष्ट्रात थेट लॉकडाऊनच लागू केला तर यात नवल वाटण्यासारकं काही नाही. नागरिकांनो भानावर या, नियम पाळा कोरोना टाळा!