एक्स्प्लोर
PHOTO: हिट अँड रननं पुन्हा मुंबई हादरली; भरधाव ऑडीनं दोन रिक्षांचा चुरडा, अंगावर शहारे आणणारा थरार!
Hit And Run Case Mumbai: मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. अपघातानंतर या प्रकरणातील ड्रायव्हर फरार असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Hit And Run Case Mulund
1/9

Hit And Run Case Mumbai : मुंबई : वरळी हिट अँड रननं संपूर्ण देश हादरला असतानाच, आता पुन्हा एकदा आणखी एका घटनेनं मुंबई हादरली आहे. वरळीतील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. अशातच आता भरधाव ऑडीनं दोन रिक्षांना उडवलं असून यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी आहे.
2/9

मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. एका ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
3/9

एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातानंतर ऑडी चालकानं घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती मिळत आहे.
4/9

मुलुंडमध्ये सकाळीच घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं खळबळ माजली आहे.
5/9

अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या हिट अँड रन अपघातानं आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
6/9

भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती मिळत आहे.
7/9

मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, चालकाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अपघातात प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
8/9

मुंबईप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवानं यात एक महिला थोडक्यात बचावल्या आहेत, मात्र त्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पिंपरी गावात हा प्रकार काल दुपारी घडला. रस्त्याच्या बाजूनं चाललेल्या महिलेला कारनं समोरून येत धडक दिली.
9/9

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत आपल्या भरधाव बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला उडवलं होतं. या अपघातात महिलेचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खटला सुरू आहे.
Published at : 22 Jul 2024 01:40 PM (IST)
आणखी पाहा























