एक्स्प्लोर
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ, राज्यभर राबवणार ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान
Maha Swachhata Abhiyan : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान राज्यभर राबवणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

CM Eknath Shinde launches Cleanliness Drive
1/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 'स्वच्छ माझा महाराष्ट्र' (Cleanliness Drive) या महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
2/7

गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
3/7

प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
4/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवण्यात आलं.
5/7

या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. 'स्वच्छ माझा महाराष्ट्र' अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावी. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.
6/7

मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितलं.
7/7

विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
Published at : 31 Dec 2023 03:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
करमणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
