एक्स्प्लोर
In Pics | पावसाचे स्वागत आपल्या आकर्षक फुलांनी करणाऱ्या 'बॅरोमीटर बुश' ला आलेला फुलोरा
barometer bushes
1/3

दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकामधील वाहतूक बेटावर महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे 'ल्युकोफायलम' ही सुशोभीकरणासाठी उपयोगात येणा-या वनस्पतीची रोपे काही महिन्यांपूर्वी लावण्यात आली होती. या रोपांनी आता चांगलेच बाळसे धरले असून त्यांना आलेली आकर्षक फुले मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
2/3

या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे या फुलांचा मुख्य बहार हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी येतो. या झाडांना बहार आल्यानंतर काही दिवसातच पावसाला सुरुवात होते असेही सांगितले जाते, ज्यामुळे या झाडांना 'बॅरोमीटर बुश' या टोपण नावाने जगभरात ओळखले जाते. ही वनस्पती मूळची अमेरिकेतील टेक्सास राज्यातील आहे.
Published at : 28 May 2021 10:46 PM (IST)
आणखी पाहा























