एक्स्प्लोर
Fire : पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू
पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली.
Pimpri Chinchwad Fire News
1/9

पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली.
2/9

या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
3/9

पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती.
4/9

हार्डवेअरमध्ये कुटुंब वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
5/9

पिंपरी चिंचवडमधील भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. चौधरी कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला.
6/9

चिखली येथील हार्डवेअर दुकानाला पहाटे पाचच्या सुमारास लागली होती. याच दुकानाच्या माळावर चौधरी कुटुंबीय राहत होतं.
7/9

दुकानात ऑईल पेंट असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. याच पेंटच्या आगीने दुकानात वायू निर्माण झाला.
8/9

आग आणि वायू यात गुदमरुन पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानचं हे कुटुंब हार्डवेअरचं दुकान चालवायचं आणि दुकानाच्या माळावर राहत होते.
9/9

शॉर्ट सर्किटमुळं ही भीषण आग लागली असल्याचा अग्निशामक दलाचा प्राथमिक अंदाज आहे.
Published at : 30 Aug 2023 10:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
