एक्स्प्लोर
Photo : ब्रॅण्ड कोल्हापूरची जगात चर्चा, प्रज्वल चौगुलेच्या क्लिकचं अॅपलकडून कौतुक

कोल्हापूर फोटोग्राफी
1/8

कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेने टिपलेल्या कोष्ट्याच्या जाळीचा अॅपलच्या टॉप 10 फोटोंच्या यादीत समावेश झाला आहे. ( फोटो सौजन्य- प्रज्वल चौगुले)
2/8

अॅपल कंपनीने घेतलेल्या स्पर्धेमध्ये जगातील पहिल्या 10 फोटोग्राफरच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. त्याने काढलेल्या कोष्ट्याच्या जाळीचा फोटोमुळे त्याला ही नवी ओळख मिळाली आहे.
3/8

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सकाळी फिरायला गेल्यानंतर एका कोष्ट्याची जाळी प्रज्वलच्या निदर्शनास आली. ही जाळी दव बिंदूच्या रुपात होती आणि तीच प्रज्वलने आपल्या कॅमेरात टिपली.
4/8

प्रज्ज्वलचा हा फोटो डिसेंबर 2021 मध्ये शिवाजी विद्यापीठातील संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या मागे असलेल्या तळ्याजवळील आहे.
5/8

जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने अॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज या स्पर्धेसाठी जगभरातून फोटो मागितले होते. यासाठी आयफोन 13 प्रो किंवा आयफोन 13 प्रो मॅक्स या मोबाईलचा वापर करुन छायाचित्रं काढण्याची अट घातली होती.
6/8

प्रज्वलने यासाठी दवबिंदूमधील कोष्ट्याच्या जाळ्याचा फोटो पाठवला होता. त्याच्या याच फोटोची निवड टॉप टेन फोटोमध्ये झाली आहे. कंपनीने प्रज्ज्वलचं छायाचित्र अॅपल डॉट कॉम या वेबसाईटसह कंपनीच्या इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलं आहे.
7/8

प्रज्वल चौगुलेचे या आधीही अनेक फोटो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जीवनशैलीला प्रज्वलने आपल्या कॅमेरात टिपलं असून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहेत.
8/8

प्रज्वल हा इंजिनिअर असून नोकरीही करतो. नोकरीसोबत प्रज्वलने फोटोग्राफीचा छंदही जोपासला आहे. (सर्व फोटो सौजन्य- प्रज्वल चौगुले)
Published at : 19 Apr 2022 08:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion