एक्स्प्लोर
Photo: आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये भेट, मुंबईत नव्या राजकारणाची नांदी?
तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी भाजपला दूर सारत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनाही महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात राजकारण करताना दिसत असून भाजपला रोखण्याचे प्रयत्न शिवसेनेचे असतील.

Shivsena Aditya Thackeray Meet RJD Tejashwi Yadav
1/10

शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे हे आज एकदिवसाच्या बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी या देखील आहेत.
2/10

आदित्य ठाकरे यांनी आज बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली.
3/10

आदित्य ठाकरे हे आपले भाऊ आहेत असा उल्लेख तेजस्वी यादव यांनी केला. तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला.
4/10

आदित्य ठाकरे यांनी यावेळी तेजस्वी यादव यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटी प्रतिमा भेट दिली.
5/10

तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांनी नंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.
6/10

आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो, पण भेटू शकलो नाही. राजकारणावर या भेटीच्या दरम्यान कोणतीही चर्चा झाली नाही. आमची मैत्री कायम राहणार अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
7/10

कायदा आणि लोकशाही वाचवण्याचं आव्हान आता देशासमोर आहे आणि ती वाचवण्यासाठी आम्ही शक्य ते करू असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले.
8/10

जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. महापालिका हातात राखायची असेल तर मराठी मतांसोबत आता उत्तर भारतीय मतांचीही शिवसेनेला गरज आहे.
9/10

त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याकडे पाहिलं जातंय. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
10/10

तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी बिहारमध्ये एकत्र येत, भाजपला दूर सारत सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनाही महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात राजकारण करताना दिसत असून कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखण्याचे प्रयत्न शिवसेनेचे असतील.
Published at : 23 Nov 2022 05:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion