एक्स्प्लोर
Nanded Lockdown | नांदेडमध्ये लॉकडाऊन निर्बंधांचं उल्लंघन, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
Nanded_Market4
1/7

नांदेडमध्य लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेच्या आधारे फळ भाजीपाला विक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. मात्र नांदेडकरांकडून या परवानगीचा फज्जा उडाला आहे. ठोक भाजीपाला विक्रीची परवानगी असताना तेथे आठवडी बाजार भरवला जातोय.
2/7

जिल्ह्यात 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान 11 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 12 या वेळेत ठोक भाजीपाला, फळे विक्रीस परवानगी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
3/7

परंतु लॉकडाऊन काळात देण्यात आलेल्या या ठोक फळ, भाजीपाला विक्री परवानगीचा नांदेडकरांनी गैरफायदा घेत कोरोना नियमावलीचं उल्लंघन केलं आहे.
4/7

शासनाने लॉकडाऊन कालावधीत फक्त ठोक फळे व भाजीपाला विक्रीची परवानगी दिली असताना शहरातील तरोडा नाका परिसरात मात्र दररोज चक्क बाजार भरवला जातोय.
5/7

अत्यावश्यक सेवेत भाजीपाला पुरवठा व नागरिकांना दैनंदिन गरजा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रशासनाने ही परवानगी दिली असताना अशा प्रकारे नांदेडकर प्रचंड गर्दी करत आहेत.
6/7

कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडवत असल्याचं चित्र आहे.
7/7

त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी सुरू केलेल्या या लॉक डाऊनचा कितपत फायदा होईल हे मात्र वेळच सांगेल.
Published at : 28 Mar 2021 09:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























