एक्स्प्लोर

मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर

नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणात नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नाशिकमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय युवकाला अटक केली आहे.

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नीट (NEET) परीक्षा दिलेल्या देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांना केंद्राने झटका दिलाय. कारण, पेपर फुटीप्रकरणामुळे यंदा 3 मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency NTA) हा निर्णय जाहीर करण्यात आला असून आता परीकेची नवी तारीख पुन्हा जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे, सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून तणाव आणि चिंता व्यक्त होत आहे. याप्रकरणी, आता सीबीआयने तपासाला सुरुवात केली असून नाशिक ते राजस्थान व्हाया हरियाणा अशा पद्धतीने ही चैन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये (Nashik) नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असून 30 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. 

नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणात नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नाशिकमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय युवकाला अटक केली आहे. संशयित आरोपीने BAMS शिक्षण घेतले असल्याची माहिती असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे. राजस्थान CBI कडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी आरोपीचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे त्याचा शोध घेत अटक केली, संबंधित युवकाची मेडिकल काऊन्सलिंग एजन्सी आहे. नीट प्रकरणातील पेपरफुटी प्रकरणानंतर आरोपीने पोलिसांपासून बचावासाठी हेअरस्टाईल बदलल्याचे प्राथमिक तपासातून उघड झालं आहे. 

दरम्यान, राजस्थान पोलिसांमार्फत एका संशयित आरोपीला ताब्यात घ्यावे अशी माहिती सकाळी देण्यात आली होती. केंद्रीय तपास पथकाच्या ताब्यात आम्ही आरोपीला देणार आहोत, त्याने हेअर स्टाईल बदलेली होती. मात्र, पोलिसांनी शिताफिने त्याला ट्रेस केल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

नाशिकमधून हरियाणात पोहोचली प्रश्नपत्रिका (Neet paper leak)

NEET पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली. नाशिकमधील ही लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले. त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, नीट परीक्षेसाठी काम करणाऱ्या संस्था आणि एजन्सीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान, नीट पेपर फुटीच्या प्रकरणाचा तपास आता देशातील सर्वात सक्षम तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयकडे देण्यात आला आहे. 

राजस्थानमध्ये 13 जणांचा चौकशी (CBI probe NEET paper leak)

सीबीआयकडून हे प्रकरण गंभीरतेनं घेण्यात आलं असून तातडीने कारवाईची चक्रे फिरली आहेत. आतापर्यंतच्या तपासानुसार, जयपूरमध्ये अटक करण्यात आलेला मनीष हाच या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येते. प्रश्नपत्रिका छपाईला जाण्यापूर्वीच, परीक्षेतील संभाव्य प्रश्न मिळवून त्याने हे कांड केले. 3 मे रोजी पार पडलेल्या परीक्षेदरम्यानच ही प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी CBI लवकरच पुढील कारवाई सुरू करेल अशी अपेक्षा आहे. सध्या राजस्थानच्या SOG च्या ताब्यात असलेल्या 13 व्यक्तींची CBI चौकशी करणार आहे. दरम्यान, परीक्षेला देशभरातून 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मात्र, आता ही परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. 

हेही वाचा

नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
Jain White Line Controversy: गिरगावात जैनांच्या पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या मनसैनिकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, सरकारी आदेशाच्या उल्लंघनाचा ठपका
गिरगावात जैनांच्या पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या मनसैनिकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, सरकारी आदेशाच्या उल्लंघनाचा ठपका
Mumbai Crime: मुंबईत बड्या राजकीय नेत्याचं बारमधील मुलीशी नको ते कृत्य, रिव्हॉल्व्हर दाखवून शरीराचे लचके तोडले, पोलीस आयुक्तांकडून कारवाईसाठी महत्त्वाचा आदेश
मुंबईत बड्या राजकीय नेत्याचं बारमधील मुलीशी नको ते कृत्य, रिव्हॉल्व्हर दाखवून शरीराचे लचके तोडले, पोलीस आयुक्तांकडून कारवाईसाठी महत्त्वाचा आदेश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Embed widget