एक्स्प्लोर
Rain : कुठं जोरदार तर कुठं मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे.
Maharashtra Rain
1/9

सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे
2/9

काही भागात सुरु असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
3/9

पुढील दोन दिवस म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे.
4/9

नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव साळुंके यांनी दिली आहे.
5/9

मुंबईसह कोकण आणि नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
6/9

प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोमुळे भारतातील हवामानावर परिणाम होत आहे. सध्या भारतातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे.
7/9

नंदूरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळं सातपुड्यात उगम पावणाऱ्या नद्यांना पूर आला आहे.
8/9

महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं गेल्या चार दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.
9/9

सध्या सुरु असलेल्या पासामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी आहेत.
Published at : 12 Sep 2023 12:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























