एक्स्प्लोर
Rain : सावधान! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Rain news
1/9

राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
2/9

सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.
3/9

पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
4/9

आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 23 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5/9

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
6/9

24 ते 26 सप्टेंबर(रविवार ते मंगळवार) दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
7/9

वाशिम जिल्ह्यात तब्बल पंधरा दिवसाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसानं काही भागात दमदार पावसाचं आगमन झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं.
8/9

वर्ध्यात धुवाधार पावसाने हजेरी लावली. वर्ध्याच्या सेलू, येळकेळी, वायगाव , देवळी भागात चांगला पाऊस पडला आहे.
9/9

अमरावती जिल्ह्यातही आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
Published at : 21 Sep 2023 08:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion