एक्स्प्लोर
Chandrapur : युट्युबच्या माध्यमातून गिरवले ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचे धडे
Dragon Fruit
1/9

युट्युबच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट या फळशेतीचे धडे घेत शेतीचा यशस्वी प्रयोग केला.
2/9

वरोरा तालुक्यात राहणारे मनीष पसारे, सुमित किनाके (आबामक्ता), भूषण ठाकरे (सोनेगाव), अमोल पिसे आणि अमोल महाकुलकर (माढेळी) या पाच शेतकरी मित्रांनी शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय केला.
3/9

या भागातील शेतजमीन ही मुरमाड असल्याने चना-सोयाबीन सारखी पारंपरिक पिकं फायदेशीर ठरत नव्हती.
4/9

मुरमाड जमिनीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा त्यांचा शोध ड्रॅगन फ्रुट या फळशेतीपाशी येऊन थांबला.
5/9

युट्युबच्या माध्यमातून त्यांनी या शेतीबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेतली.
6/9

लातूर-सांगोला या भागात जाऊन ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची खरेदी केली.
7/9

शेतीमध्ये बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर या रोपांची ट्रेलर पद्धतीने लागवड करण्यात आली.
8/9

सध्या या रोपांनी जोम धरला असून साधारण एक वर्षांची झाली की रोपांना फळधारणा व्हायला सुरुवात होईल.
9/9

साधारण एक एकर लागवडीसाठी त्यांना सात लाखांचा खर्च आला. पहिल्याच वर्षी चार लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
Published at : 08 Mar 2022 10:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























