एक्स्प्लोर
Latur Lockdown | लातुरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

लातूर लॉकडाऊन,
1/10

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
2/10

गेल्या तीन दिवसात जवळपास 550 रुग्ण वाढले असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही एक हजाराच्या वर गेली आहे. परिणामी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्ह्यात नवीन नियमावली लागू केली आहे. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
3/10

लातूर शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या गंजगोलाईची छायाचित्रे असून सोळा रस्ते या भागात एकत्र येतात. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
4/10

सर्वच प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, यात्रा, उर्स, सामूहिक नमाज, सभा संमेलने, आंदोलनाना पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
5/10

मागील काही दिवसांपासून रोज करोना बाधितांचा आकडा 100 च्या पुढे जात आहे.यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. (फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
6/10

लातुरमधील पेट्रोलपंपवर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
7/10

गोलाईतील कायम गजबजलेली कापड लाईन (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
8/10

लातूरमधील हनुमान चौकातील चित्र (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
9/10

प्रत्येक रस्त्यावरील दुतर्फा असणाऱ्या दुकानात कायमच गर्दी असते मात्र रात्री आठ नंतर येथे सामसूम होती यावेळी मोठा पोलीस बंदोस्त लावण्यात आला होता. (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
10/10

15 मार्चपासून लातूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. तर जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य - श्याम भट्टड )
Published at : 16 Mar 2021 01:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
अहमदनगर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
