एक्स्प्लोर
Latur Earthquake : लातूरमध्ये भूगर्भातून आवाज नाही तर तो सौम्य भूकंपच; गावकऱ्यांची चिंता वाढली!
Latur earthquake News: लातूर जिल्ह्यातील हासोरी गावात मागील 15 दिवसापासून अनेक वेळा भूगर्भातून मोठा आवाज येत होता. याची माहिती गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिली होती.
Latur earthquake News
1/10
![लातूर जिल्ह्यातील हासोरी गावात मागील 15 दिवसापासून अनेक वेळा भूगर्भातून मोठा आवाज येत होता. याची माहिती गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लातूर जिल्ह्यातील हासोरी गावात मागील 15 दिवसापासून अनेक वेळा भूगर्भातून मोठा आवाज येत होता. याची माहिती गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिली होती.
2/10
![प्रशासनानं त्याची भूकंपमापन यंत्रणेवर नोंद नाही, या भूगर्भातील हालचाली आहेत, असं सांगितलं होतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रशासनानं त्याची भूकंपमापन यंत्रणेवर नोंद नाही, या भूगर्भातील हालचाली आहेत, असं सांगितलं होतं.
3/10
![मात्र सततच्या आवाजामुळे गावकरी चिंतेत होते. दिल्ली, मुंबई आणि लातूरच्या पथकाने तपासणी केल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी तो आवाज म्हणजे भूकंपच असल्याचं सांगितलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मात्र सततच्या आवाजामुळे गावकरी चिंतेत होते. दिल्ली, मुंबई आणि लातूरच्या पथकाने तपासणी केल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी तो आवाज म्हणजे भूकंपच असल्याचं सांगितलं आहे.
4/10
![या सर्व कारणामुळे लातूरमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या सर्व कारणामुळे लातूरमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे.
5/10
![लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी दिली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी दिली.
6/10
![मागील काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात जमिनीतून मोठे आवाज येत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मागील काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात जमिनीतून मोठे आवाज येत आहेत.
7/10
![त्यामुळे या भागातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यामुळे या भागातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.
8/10
![या भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
9/10
![प्रशासनाने मात्र भूकंप नाही, केवळ जमिनीतून आवाज येत आहेत असे सांगितले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रशासनाने मात्र भूकंप नाही, केवळ जमिनीतून आवाज येत आहेत असे सांगितले होते.
10/10
![मागील अनेक दिवस प्रशासन भूगर्भातील हालचालीमुळे हा आवाज येतोय असं सांगत होते. मात्र गावकरी वेळोवेळी हा भूकंपच आहे यावर ठाम होते. अखेर तेच खरं झालं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मागील अनेक दिवस प्रशासन भूगर्भातील हालचालीमुळे हा आवाज येतोय असं सांगत होते. मात्र गावकरी वेळोवेळी हा भूकंपच आहे यावर ठाम होते. अखेर तेच खरं झालं आहे.
Published at : 24 Sep 2022 08:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)