एक्स्प्लोर
PHOTO : गोदावरी नदीचं गटारात रुपांतर, नांदेड पालिकेचा हलगर्जीपणा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/2b855a8af86fa29e8bd5dfacad005264_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
godavari river
1/8
![नांदेडमधील गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. ब्रह्मगिरी ते राजमुद्री असा तब्बल 1465 किलोमीटरचा प्रवाह असलेल्या गोदावरी नदीचा नांदेड हा मध्यबिंदू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef970be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नांदेडमधील गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. ब्रह्मगिरी ते राजमुद्री असा तब्बल 1465 किलोमीटरचा प्रवाह असलेल्या गोदावरी नदीचा नांदेड हा मध्यबिंदू आहे.
2/8
![गोवर्धनघाट ते वाजेगाव बंधारादरम्यान नदीच्या पात्रातील पाणी सडले असून कचरा, प्लॉस्टिक यासोबतच शहरातील सांडपाणी अशा 26 नाल्यांद्वारे नदीच्या पात्रात मिसळत असल्याने परिसरातील दुर्गंधीत वाढ झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/032b2cc936860b03048302d991c3498fa5d53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोवर्धनघाट ते वाजेगाव बंधारादरम्यान नदीच्या पात्रातील पाणी सडले असून कचरा, प्लॉस्टिक यासोबतच शहरातील सांडपाणी अशा 26 नाल्यांद्वारे नदीच्या पात्रात मिसळत असल्याने परिसरातील दुर्गंधीत वाढ झाली आहे.
3/8
![तर महापालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प फक्त नावालाच उरला असून महापालिका प्रशासन मात्र काहीच प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800dbd83.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर महापालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प फक्त नावालाच उरला असून महापालिका प्रशासन मात्र काहीच प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे.
4/8
![याठिकाणी सर्व धर्मियांची विविध श्रद्धास्थानं ही या गोदावरी नदी पात्रालगत आहेत. पण याच नदीला आता अक्षरश: गटाराचे स्वरुप आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/174772c59cb2315cb641467bf12787f0c2909.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याठिकाणी सर्व धर्मियांची विविध श्रद्धास्थानं ही या गोदावरी नदी पात्रालगत आहेत. पण याच नदीला आता अक्षरश: गटाराचे स्वरुप आले आहे.
5/8
![जगभरातील शीख धर्मियांचे श्रध्दास्थान सचखंड हुजुरसाहिब गुरुद्वारा, बंदाघाट, नगिनाघाट, शिकारघाट, लगरसाहिब गुरुद्वारा, या पवित्र गुरुद्वाराच्या पायथ्याजवळूनही नदीचा प्रवाह वाहतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660f94ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभरातील शीख धर्मियांचे श्रध्दास्थान सचखंड हुजुरसाहिब गुरुद्वारा, बंदाघाट, नगिनाघाट, शिकारघाट, लगरसाहिब गुरुद्वारा, या पवित्र गुरुद्वाराच्या पायथ्याजवळूनही नदीचा प्रवाह वाहतो.
6/8
![हिंदूही जवळच्यांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून विविध कार्य करण्यास या नदी काठावर येत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/156005c5baf40ff51a327f1c34f2975b6b1d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंदूही जवळच्यांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून विविध कार्य करण्यास या नदी काठावर येत असतात.
7/8
![त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गोदावरी नदीचे चित्र मात्र सद्यस्थितीला क्लेशदायक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/8cda81fc7ad906927144235dda5fdf157ee04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गोदावरी नदीचे चित्र मात्र सद्यस्थितीला क्लेशदायक आहे.
8/8
![गोदावरीनदीत सोडण्यात येणाऱ्या या दूषित पाण्यामुळे नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे त्यातील विविध प्रजातीचे मासे, झिंगे, कासव, मगरी, पानसाप, पान कोंबडे, बगळे, मासे असे विविध जीव ही धोक्यात आले आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/17/18e2999891374a475d0687ca9f989d834b0f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोदावरीनदीत सोडण्यात येणाऱ्या या दूषित पाण्यामुळे नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे त्यातील विविध प्रजातीचे मासे, झिंगे, कासव, मगरी, पानसाप, पान कोंबडे, बगळे, मासे असे विविध जीव ही धोक्यात आले आहेत
Published at : 17 Feb 2022 08:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)